कंगनासाठी हिमाचल प्रदेशमधून गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमकीचा फोन

Kangana Ranaut - Anil Deshmukh

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखे वाटते, असे म्हटले होते . कंगणाच्या या वक्तव्यामुळे चांगलेच वादंग पेटले आहे . आता या वादात गुंडांनीही उच्छाद मांडला आहे. हिमाचल प्रदेशमधील काही गुंडांनी थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून धमकी दिल्याचे समोर आले आहे.

कंगना राणावत प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना हिमाचल प्रदेश मधून सतत धमकीचे फोन आले. ‘कंगना राणावत से दूर रहो…ये बात समझ लो…तुमने गलत किया अभी भी संभल जाओ नही तो…’ अशा आशयाचे धमकीचे फोन गृहमंत्र्यांना आले.

धमकीचे हे फोन हिमाचल प्रदेशमधून (Himachal Pradesh) आले आहे. मंगळवारी दिवसभरात काही फोन आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढंच नाहीतर आज कंगना मुंबईत दाखल होणार आहे. त्यामुळे आज भल्या पहाटे पण काही फोन आल्याची माहिती मिळाली आहे. वेगवेगळ्या नंबरवरून गृहमंत्र्यांना फोन करून धमकीचे सत्र सुरू आहे.

दरम्यान याअगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) या तिघांना वेगवेगळ्या वेळी आलेल्या धमकीच्या फोनमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या संबंधाने सर्वत्र चर्चेचे रान पेटले असताना तपास यंत्रणांनी फोन करणाऱ्यांना शोधण्यासाठी वेगवेगळी पथके कमी लावली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER