गुंडाकडुन वाजेगांवच्या डाँक्टरला धमकी ; तुमच्याकडचे पैसे ,मौल्यवान वस्तु द्या ! नाही तर परिणामाला सामोरे जा !

ग्रामिण पोलिस ठाण्या हद्दीतील घटना

Phone call thread

नविन नांदेड  :- प्रतिनिधी- वाजेगाव येथील प्रसिध्द काविळ तज्ञ डाँ रावसाहेब सावरगावकर यांच्याकडे सुरु असलेल्या हरिनाम सप्ताह सोहळ्यात जावुन अज्ञात दोन युवकांनी तुमच्याकडे असलेले पैसे ,मौल्यवान वस्तु आम्हाला द्या ! नाही तर कोकुलवार सारखा परिणाम भोगावा लागेल अशी धमकी दिल्याची घटना दि 9 फेब्रुवारी रोजी घडली . याप्रकरणी नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात अज्ञात दोन आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे . या घटनेमुळे पोलिसाची गुन्हेगारावरील वचक नसल्याचे दिसुन येत आहे .

मुखेड: द्वादश पट्टाभिषेक सोहळ्यानिमित्य चार दिवस भरगच्च कार्यक्रम

पोलीस सुञांनी दिलेल्या माहितीवरुन वाजेगाव येथील काविळाचे प्रसिध्द डाँ रावसाहेब सावरगावकर यांनी गेल्या अनेक वर्षापासुन अखंड हरिनाम सप्ताह व भागवत सप्ताह दरवर्षी घेतात . दि 6 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हा सप्ताह सुरु असतानाच दि 9 फेब्रुवारी रोजी सायकांळी चार वाजता भागवत कथा सुरु असताना 30 ते 35 वयोगटातील अज्ञात एका युवकांनी कथा श्रवण करत असलेल्या डाँ रावसाहेब सावरगावकर यांना तुमचे पाहुणे बाहेर बोलवत असल्याचे सांगुन डाँ सावरगावकरांना मंडपा बाहेर आणले . दुसर्‍या युवकांने आम्हाला बाँसने तुमच्याकडे अमाप पैसे व मौल्यवान वस्तु आहेत ते घेवुन या असे सांगितले आहे . पैसे व मौल्यवान वस्तु तुम्ही लवकरात लवकर आम्हाला द्या ! असे ते म्हणाले . डाँ सावरगावकर यांनी मी कामात आहे असे सांगत वेळ व पैसे देण्यास नकार देताच त्यातील एका युवकांनी बाँसला बोला म्हणुन मोबाईल काढतच आमच्या बाँसला डाँ कञुरवार यांनी पण आम्हाला पैसे दिले आहेत . परंतु गोविंद कोकुलवार यांनी पैसे देण्यास नकार दिला त्याचा परिणाम काय झाला हे तुम्हाला माहितच आहे. कोकुलवार सारखी तुमच्यावर वेळ येवु नये आम्ही समजावुन सांगण्यासाठी आलो आहोत . याबाबत पोलिसाकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या जिवाला धोका होईल . तुम्ही विचार करा आम्ही फोन करतो म्हणुन डाँ सावरगावकरचा मोबाईल नंबर घेतला .

पोलिसात संर्पक करुन तुमचा फायदा तर होणार नाही .उलट जिवास मुकाल अशी धमकी देवुन कोकुलवार प्रकरणात आमचे साथीदार जेल मध्ये आहेत . आम्ही बाहेर राहुन बाँसचे काम करीत आहोत . तुम्ही पैसेची व मौल्यवान वस्तु जमा करा आम्ही तुम्हाला फोन करतो . अशी फिर्याद डाँ रावसाहेब सावरगावकर यांनी ग्रामिण पोलिस ठाण्यात दिली . या प्रकरणी ग्रामिण पोलिस ठाण्यात अज्ञात दोन युवका विरुध्द कलम 385 ,34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे . अधिक तपास पो. निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरिक्षक गोविंद खैरे हे तपास करित आहेत.

गेल्या काही दिवसापासुन अशा प्रकारे धमकावुन पैसे लुबाडणार्‍या गुंडाना जिल्हा पोलिसप्रमुखाच्या पथकाने जेर बंद केले असताना पुन्हा तोच प्रकार ग्रामिण भागात झाल्याने पोलिसांचा वचक गुन्हेगारीवरील ठेपाळी असल्याचे दिसत असल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे . धार्मिक कार्यक्रमात जावुन असा धमकावण्याचा प्रकार पहिला असला तरी गुन्हेगार डोके वर काढत असल्याचे दिसुन येत आहे .