ज्येष्ठ नेते शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी ; २६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

NCP - Sharad Pawar

मुंबई :- भाजप नेत्यांच्या आणि पक्षाच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बाबत आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी केल्याप्रकरणी तसेच जीवे मारण्याची धमकी (threatened-kill sharad-pawar-offensive-writing-fake-social-media-account) दिल्या प्रकरणी तब्बल 26 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल (Case filed against 26 persons) करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत संभाजी वरपे (वय 34, रा. पिंपळे निलख, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. हा प्रकार 27 मार्च ते 7 एप्रिल 2021 या कालावधीत बनावट फेसबुक पेज, फेसबुक अकाउंट आणि ट्‌विटर अकाउंट यावर घडला आहे.

फेसबुक पेज सीएम देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) फॅन क्लब पोस्टेड बाय धनंजय जोशी, राजकारण महाराष्ट्राचे पोस्टेड बाय अतुल अयचित, राजकारण महाराष्ट्राचे पोस्टेड बाय सोनाली राणे, भाजप सोशल मीडिया वॉर रूम महाराष्ट्र पोस्टेड बाय मधुकर वाघमारे, टकलु हैवान, देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या फेसबुक पेज चालवणाऱ्या व्यक्ती तसेच फेसबुक अकाऊटधारक राजेंद्र पवार, गिरीश गणू, सिद्धार्थ जोशी, विश्वम्बर देव, गोविंद कुलकर्णी, धनंजय जोशी, महेश गबुडले, विक्रांत एस. जोशी, नाना पंडीत, राम शिंदे पाटील, शशिकांत आहिरे, राधा माने, सोनाली राणे, भानू बोराडे, सचिन दाभाडे पाटील, श्रीकांत पाटील, नितीन मताले, दयानंद पाटील, अजय राठोड आणि ट्विटर अकाउंट धारक रुद्र देव, विमुक्त आदींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

माहितीनुसार, आरोपींनी बनावट फेसबुक पेज, फेसबुक अकाउंट, ट्विटर अकाउंट या सोशल मीडियावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह, हिणकस, विकृत, बदनामीकारक लिखाण केले. तसेच सोशल मीडियावरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button