सोलापुरात अंत्ययात्रेसाठी हजारोंची गर्दी; प्रशासनही हतबल

Solapur - Maharashtra Today

सोलापूर : राज्यात कोरोना संकट अद्यापही टळलेले नाही. ठाकरे सरकारकडून लॉकडाऊन १ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. या दरम्यान अनेक जिल्ह्यांनी परिस्थितीनुसार निर्बंध कडक केले आहेत. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एकीकडे राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. नुकतेच सोलापुरात कोरोना लढ्याला धक्का देणारी घटना समोर आली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे करण म्हेत्रे यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रविवारी अंत्ययात्रेला जवळपास हजारोंची गर्दी जमली. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १४४ कलम लागू करण्यात आले आहे. करण म्हेत्रे यांचे पार्थिव मोदी स्मशानभूमीच्या दिशेने जात असताना मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. या गर्दीमुळे सोलापुरात कोरोनाचा विस्फोट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

करण म्हेत्रे यांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. यामुळे कार्यकर्त्यांवर एकच शोककळा पसरली. कार्यकर्त्यांना मृत्यूची माहिती मिळताच रुग्णालयाच्या परिसरात जमा झाले. आपला नेता गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश निर्माण झाला. या संकटातही अंत्यसंस्कारासाठी हजारोंची गर्दी झाल्याने सोलापुरातील प्रशासकीय यंत्रणेची झोप उडाली आहे. आपत्कालीन परिस्थितीत ही गर्दी करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button