
लंडन/ शिकागो / ह्यूस्टन : कंटेनर घेऊन जाणारे चीनचे एक मोठे जहाज स्वेझच्या (Suez Canal) कालव्यात फसल्याने या कालव्यातून होणारी जहाजांची वाहतूक बंद पडली आहे. कालव्याच्या दोन्ही बाजूला जहाजांच्या रांगा लागल्या आहेत. ज्या जहाजांमध्ये प्राणी आहे त्या जहाजांमध्ये स्थिती अत्यन्त कठीण झाली आहे.
कालवा प्रशासनाचे किंवा जहाजांवरचे अधिकारी माहिती देण्यास नकार देत आहेत. मात्र, ‘ब्लूमबर्गने'(Bloomberg) संकलित केलेल्या आकडेवारीवरून असे लक्षात येते की, या वाहतूक कोंडीत अडकलेल्या किमान १० जहाजांमध्ये प्राणी आहेत. युरोप ते सौदी अरेबिया या मार्गावर मोठ्या प्रमाणात मेंढ्यांची वाहतूक होत असते.
ज्या जहाजांमध्ये तेल, कपडे अशा दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तू असतात त्यांना फार अडचण नसते. मात्र, ज्या जहाजांमध्ये प्राणी असतात त्या जहाजात प्राण्यांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था असते. मात्र हा साठा काही दिवसांपुरताच असतो त्यामुळे ही वाहतूक कोंडी लवकर फुटली नाही तर जहाजांवरील प्राण्यांची स्थिती कठीण होण्याचा धोका आहे. फक्त दोन दिवस वाहतूक कोंडी कायम राहिली तर काही अडचण येणार नाही पण ती त्यापेक्ष जास्त लांबली तर स्थिती कठीण होऊ शकते, असे ऍनिमल कम्पायन्स इन वर्ल्ड फार्मिंग या पशु-कल्याण समूहाचे मुख्य धोरण अधिकारी पीटर स्टीव्हनसन म्हणालेत.
जहाजांमधून प्राण्यांची वाहतूक चार – पाच दिवसांच्या प्रवासाच्या अंतरापर्यंत करण्यात येते. मेंढ्यां जास्त यापेक्षा जास्त दिवस जहाजावर राहिल्यात तर त्यांच्यात रोगाची साथ पसरण्याचा धोका असतो, असे ते म्हणालेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला