लोकल सेवेत कपात करण्याचा विचार : विजय वडेट्टीवार

Local Train - Vijay Wadettiwar

मुंबई :- महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून आठ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का, यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी खुलासा केला की, राज्यात कोरोना (Corona) वाढत असला तरी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन (Lockdown) होणार नाही. मात्र, यावर उपाय म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे निर्बंध कटाक्षाने पाळावे लागेल. तसेच मास्कच्या  नियमांचे पालन करण्यासाठी कठोर धोरण अवलंबले जाईल. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, सर्वसामान्यांसाठी सुरू असलेल्या लोकल ट्रेनमध्ये कपात करण्यात येईल.

त्याचबरोबर, बसेसवरही निर्बंध घालणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. शुक्रवारी ८ हजार ७०० रुग्ण आढळले आहेत. ६५ ते ७० टक्के कोरोना रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रात सापडत आहेत. ही राज्ये कोरोना हॉटस्पॉट बनत आहेत. या ठिकाणी कडक निर्बंध वाढवले जाईल. पण राज्यव्यापी लॉकडाऊन असेल असे नाही. भविष्यात महाराष्ट्रामध्ये काही कठोर नियम आणि कायदे लागू करण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. लोकल ट्रेनच्या (Local Train) सेवेत कपात करणे, बाजारपेठांबाबत  कडक निर्बंध लागू करणे, बसगाड्यातील गर्दी कमी करणे यावर काम करण्याची गरज आहे. त्याचबरोबर शहरातील मोठमोठे मॉल्स बंद ठेवणे.

मंगल कार्यालयांवर आणि इतर लग्नस्थळावर नजर ठेवणे गरजेचे आहे. गर्दी होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. परीक्षांबाबत वडेट्टीवार यांनी सांगितले की, “ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेता येतील का, याचा विचार सुरू आहे. या वर्षी तमिळनाडूमध्ये सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले आहे. महाराष्ट्रात परीक्षा घेण्याची गरज आहे, यावर अनेकांची मतं घेऊन विचार केला जात आहे. सर्व प्रकारच्या शक्यतांवर विचारविमर्श करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.” असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER