… तरी महाराष्ट्र लढेल आणि जिंकेल; जितेंद्र आव्हाडांची केंद्र सरकारवर टीका

Jitendra Awhad

मुंबई : कोरोनामुळे दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक होत असताना केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे . याच मुद्द्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आकडेवारी मांडत केंद्राला उत्तर दिलं आहे.

आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की , सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रास ११२१ व्हेंटिलेटर्स, १७०० उत्तरप्रदेशला, १५०० झारखंडला, १६०० गुजरातला, १५२ मध्यप्रदेशला आणि २३० छत्तीसगढला -डॅा. हर्षवर्धन यांची माहिती. …..तरी महाराष्ट्र लढेल आणि जिंकेल ……जय महाराष्ट्र,” असे ट्वीट करत आव्हाड यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी करोना प्रभावित ११ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांचा शनिवारी आढावा घेतला. या बैठकीला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी करोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या व्हेंटिलेटर्स वाटपाची माहिती दिली. यात उत्तर प्रदेश, गुजरातपेक्षा महाराष्ट्राला कमी व्हेंटिलेटर्स देण्यात आलेली असून, त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष वेधले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button