नागपूर मनपात भाजपाचे बहुमत तरी, महापौरसाठी काँग्रेसने दिली दोघांना उमेदवारी!

BJP - Nagpur Municipal Corporation - Congress

नागपूर : नागपुरात काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली. मनपात भाजपाचे बहुमत असताना महापौर निवडणुकीसाठी (Nagpur Mayor Election) काँग्रेसने दोन उमेदवार रिंगणात उतरवले! यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. (Congress Two candidates for Nagpur Mayor Election)

महापौर संदीप जोशी (Sandeep Joshi) यांच्या राजीनाम्यानंतर नव्या महापौराच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मनपात १५१ पैकी काँग्रेसचे फक्त २९ नगरसेवक आहेत. भाजपाचे १०८ नगरसेवक आहेत. भाजपला स्पष्ट बहुमत आहे.

काँग्रेसच्या मनोज गावंडे आणि रमेश पुणेकर यांनी महापौर पदासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजीची उघड झाली आहे. भाजपाने दयाशंकर तिवारी (Dayashankar Tiwari) याना रिंगणात उतरले आहेत. उपमहापौर पदासाठी भाजपायाच्या मनीषा धावडे (Manisha Dhawade) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीतही संघर्ष

मनपाच्या निवडणुकांसाठी वर्षभरापेक्षा जास्त कालावधी आहे. मात्र, सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. काँग्रेसने सन्मानजनक जागा दिल्या नाही तर सर्व जागा स्वबळावर लढू, असा इशारा राष्ट्रवादीचे नागपूर शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी आधीच दिला आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि उपमहापौर मनीषा कोठे यांनी २१ डिसेंबरला पदाचा राजीनामा दिला. आधी ठरल्याप्रमाणे त्यांचा १३ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतरच महापौर निवडीच्यावेळी 13 महिने संदीप जोशी आणि 13 महिने दयाशंकर तिवारी महापौर राहतील, असे सूत्र ठरले होते. (Congress Two candidates for Nagpur Mayor Election)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER