पक्ष आणि संघाच्या जीवावर निवडून येणारे स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत; प्रसाद लाड यांचा खडसेंना टोमणा

Prasad LAD & Eknath Khadse

मुंबई : भाजपा सोडून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यात सध्या शाब्दिक चकमक सुरू आहे. “जनतेने मला सलग सहा वेळा निवडून दिलं. प्रसाद लाड यांनी किमान एकदा तरी जनतेतून निवडून येऊन दाखवावं.” असं  आव्हान खडसे यांनी दिलं  होतं.

उत्तरात प्रसाद लाड यांनी खडसेंना उत्तर दिलं – भाजपा संघटना आणि रा.स्व.संघाच्या जीवावर निवडून येणारे स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत. तरीही पक्ष नेतृत्वाला दोष देऊन पक्षत्याग केला. खडसेंवर टीका करताना लाड म्हणालेत, “स्वतःची एवढी ताकद होती, तर स्वतःच्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत?

मी नक्कीच स्वतः सात वेळा निवडून येईन याची मला खात्री आहे.” त्यांनी ट्विट केले – “आजवरच्या राजकारणात भाजपा संघटना आणि रा.स्व.संघाच्या जीवावर निवडून येणारे स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत. तरीही पक्षनेतृत्वाला दोष देऊन पक्षत्याग केला. ज्या पक्षाने एवढं दिलं, अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येऊन पदं  उपभोगली, तेच नेते आता इतरांना शिकवत आहेत.”

मी भाजपामधून गेल्याचा परिणाम होत नसेल, तर भाजपाचे पदाधिकारी सतत एकनाथ खडसे गेल्यावर परिणाम होणार नसल्याचं  का सांगतात? आपल्या मुलीचा पराभव झाल्याबाबत खडसेंनी आरोप केला – माझ्या मुलीचा पराभव करण्यासाठी पक्षविरोधी काम करण्यात आलं. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचाच ही जागा पाडण्यासाठी आतून पाठिंबा होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER