अमानुष कृत्य करणाऱ्यांना जबर शिक्षा झाली पाहिजे ; हाथरस घटनेवर अजितदादांनी व्यक्त केला संताप

Ajit Pawar

मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras) येथील तरुणीवरील सामूहिक अत्याचाराचे प्रकरण आणि पीडित तरुणीचा आज मृत्यू झाल्याची घटना अत्यंत क्लेशदायक, संतापजनक आणि लाजिरवाणी आहे. असं कृत्य करणारे नराधम समाजात आहेत हे सहन होण्यापलीकडे आहे. असं अमानुष कृत्य करणाऱ्यांना त्यांच्या कृत्यापेक्षाही जबर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे.

उत्तर प्रदेश सरकारने (UP Govt) न्यायालयीन प्रक्रिया तातडीने पूर्ण करून या घटनेतील आरोपींना त्यांच्या पापाचं फळ लवकरात लवकर द्यावं. न्यायालयाच्या माध्यमातून आरोपींना कठोर शिक्षा देत असतानाच स्त्रीशक्तीचा आदर करणाऱ्या सभ्य समाजनिर्मितीची जबाबदारीही आपल्या सर्वांची आहे. महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन सकारात्मक होईल, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे, असेही अजित पवार यांनी नमूद केले आहे. हाथरसची घटना ही या देशातील शेवटची घटना ठरावी यासाठी शासन, न्यायालय आणि समाज सर्वजण मिळून प्रयत्न करतील, आपापली जबाबदारी पार पाडतील असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाथरस येथील पीडीत तरुणीला श्रद्धांजली वाहिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER