मुली उचलून आणण्याची भाषा करणारे, साधूंसाठी आंदोलन करतायेत ; राष्ट्रवादीचा भाजप नेत्याला टोला

Ram Kadam - NCP

मुंबई : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एका गावात जमावाने तीन साधूंची हत्या केली होती. त्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी भाजप नेते राम कदम यांना नोटीस बजावली आहे. साधूंच्या झालेल्या हत्येप्रकरणी त्याना न्याय मिळवून देण्यासाठी राम कदम पालघर याठिकाणी जायला निघाले होते. दरम्यान मुंबई पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली असून घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे.

या प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून राम कदमांवर बोचरी टीका केली आहे. राष्ट्रवादीनं आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून म्हटले की, भाजप नेते राम कदम पुन्हा एकदा पालघर साधू हत्याकांड प्रकरण चर्चेत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हे त्यांच्या अपयशाचे प्रतीक आहे. राज्यात फोफावत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या बाबतीत ते अजिबात गंभीर नाहीत, असेही राष्ट्रवादीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

‘करून करून भागले आणि देवधर्माला लागले, ही मराठीतील म्हण महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या ‘चमको’ नेत्यांना तंतोतंत लागू पडते. कालपर्यंत मुली उचलून आणण्याची भाषा वापरणारे आज साधूंसाठी आंदोलन करतायत. जणाची नाही तर मनाची तरी बाळगावी.’ यावेळी राष्ट्रवादीने एक विशेष हॅश्टॅगही वापरले आहे. त्यांनी ‘एक कदम कोरोना की ओर’ असा हॅशटग वापरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button