वाईट म्हणणारे चार दिवस बोलतील; पण योग्य वेळी मंदिरे उघडणार- मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray

मुंबई : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज दुपारी १.३० वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाचे संकट टळले नसल्याचे स्पष्ट करत राज्यातील मंदिरे उघडी करण्याबाबत योग्य वेळी निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळा हाच एकमेव उपाय आहे. तो नियम मंदिरांसाठीही लागू होतो. काही लोक मंदिरे उघडी करण्याची मागणी करत आहेत. मात्र राज्याच्या हितासाठी मी वाईटपणा घेण्यासही तयार आहे. वाईट म्हणणारे चार दिवस बोलतील; पण योग्य वेळी मंदिरे उघडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाचे संकट थोडे कमी झाल्यास मंदिर, प्रार्थनास्थळं सुरू करण्यासाठी लवकरच नियमावली तयार करू, असे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER