संरक्षण समितीच्या बैठकीत कधीही भाग न घेणारे विचारतात सैन्यावर प्रश्न

- नड्डा यांचा राहुलला टोमणा

Rahul-Nadda

नवी दिल्ली : भारत – चीन सीमेवरील संघर्षानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी सतत सरकारला प्रश्न विचारतात. मात्र, राहुल संसदेच्या संरक्षण स्थायी समितीच्या एकाही बैठकीला हजर राहिले नाहीत. यावरून भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राहुलला टोमणा मारला – संरक्षण समितीच्या बैठकीत कधीही भाग न घेणारे विचारतात सैन्यावर प्रश्न! नड्डा यांनी ट्विट करून राहुल गांधी यांच्यवर टीका केली – “राहुल गांधी संसदेच्या संरक्षण स्थायी समितीच्या एकाही बैठकीत उपस्थित राहिले नाहीत.मात्र, वेदनादायी गोष्ट अशी की, ते सातत्याने देशाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. लष्कराच्या शौर्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. राहुल गांधी ते सगळ करत आहेत, जे जबाबदार विरोक्षी पक्षनेत्याने करायला नको! ”

दुसऱ्या ट्विटमध्ये नड्डा यांनी गांधी घराण्यावरच्या संरक्षणाच्या व्यवहारात कमिशन खाण्याच्या आरोपांसंदर्भात टोमणा मारला आहे – “राहुल गांधी अशा वंशपरंपरेतून येतात, जिथे संरक्षणा संबंधित समित्यांना काही स्थान नाही. फक्त ‘कमिशन’ला महत्त्व आहे. काँग्रेसमध्ये पात्रता असलेले असे अनेक नेते आहेत ज्यांना संसदीय विषयांचे महत्त्व माहीत आहे, पण घराणेशाही अशा नेत्यांना मोठे होऊ देणार नाही; ही शोकांतिका आहे.