वल्गना करणार्यांना लोकशाहीची ताकद कळली : पालकमंत्री सतेज पाटील

Satej Patil

कोल्हापूर : मतदानादिवशी पहिल्या फेरीतच आमचा उमेदवार निवडून येईल, आता केवळ ग्रामपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषदेची निवडणूक उरली आहे अशी वल्गना करणार्यांना लोकशाहीची ताकद कळली, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी आज केले. शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर आणि पदवीधर आमदार अरुण लाड यांच्या जाहीर सत्कार समारंभात केले.

ना. पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. संघटित ताकत पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या मागे राहिली. या निवडणुकीत पाच जिह्यातील पक्षीय ताकद गरजेची होती. विधानपरिषदेच्या निवडणुकीपूर्वीच दिवाळी झाली असली तरी निकालाचा दिवस महाविकास आघाडीसाठी मोठा सणाचा दिवस ठरला. हे मतदारांनी दाखवून दिले आहे.

पाचही जिह्यातील कार्यकर्त्यांनी मताधिक्य मिळवून दिले. दोन नंबरची मते कोणाला मिळतात ? याबाबत मनात तणाव होता. मात्र प्रा.जयंत आसगवाकर व अरुण लाड यांनी जे लीड घेतले होते ते तुटले नाही. या दोन्ही आमदारांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात विकासाला नक्कीच चालना मिळेल अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली. पूर्वीपासूनच खासदार धैर्यशील माने आमच्यासोबत असते, तर राजाराम कारखाना हातात असता. भविष्यातील सर्व निवडणुकाही आपण एकत्र लढविणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER