अजितदादांचा गौप्यस्फोट : जे साहेबांना सोडून गेले ते पडले; आता मोठा पक्षप्रवेश घेऊ

Ajit Pawar & Sharad Pawar

अहमदनगर :- आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना तुफान फटकेबाजी केली. जे लोक पडत्या काळात आपल्याला सोडून गेलेत, ते पडलेत. आता त्यांना लोकही सोडून देतील, असा टोला त्यांनी मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांना हाणला. तसेच लवकरच राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम होणार असल्याचा गौप्यस्फोट केला. राहुरी तालुक्यातील वांबोरी ‌येथे मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. यावेळी ते बोलत होते. “काही लोक शरद पवारांना (Sharad Pawar) सोडून गेले, अकोल्यात त्यांची काय गत झाली बघा. सोडून गेलेले पडले.” असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार वैभव पिचड (Vaibhav Pichad) आणि मधुकर पिचड या पितापुत्रांना टोला लगावला. वाढपी तुमचाच आहे, पंगत जेवायला बसली आहे.

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) जे जे नेते येतील त्यांना प्राधान्य दिले जाईल. लवकरच मोठा पक्षप्रवेश होईल, असेही ते म्हणाले. “विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात दहा, अहमदनगरमधून राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आले. सातवे शंकरराव गडाखही आले.  आघाडीतले बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आले. आशुतोष काळे हा तरुण सहकारी आला. रोहित पवारला (Rohit Pawar) कर्जत जामखेडच्या जनतेने आशीर्वाद दिला. संग्राम जगताप दुसऱ्यांदा निवडून आला. शंकरराव सिनिअर आहेत, तेही दुसऱ्यांदा आले. बाळासाहेब थोरात तर १९८५ पासून विधानसभेवर आहेत. त्यांची सातवी-आठवी टर्म आहे.” असं अजित पवार सांगत आहेत. “प्राजक्त तनपुरेंना नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास अशा पाच-सहा मंत्रालयांचं राज्यमंत्रिपद मिळालं. मी पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा मलाही राज्यमंत्रिपद देण्यात आलं होतं; पण मला कृषी, फलोत्पादन आणि ऊर्जा अशी तीनच खाती होती आणि या पठ्ठ्याला बघा… वाढपी तुमचाच आहे, पंगत जेवायला बसली आहे, राहुरीला जास्त मिळणार यात शंकाच नाही.

पण वाढपी कशामुळे निवडून आला, तर कोपरगाव, संगमनेर, राहुरी, अहमदनगर अशा सगळ्या मतदारसंघांमुळे. प्राजक्ता, इथेही लक्ष दे रे बाबा, माझ्या बारामतीकडे नंतर लक्ष दिलंस तरी चालेल. पण सगळ्यांना वाटलं पाहिजे, राहुरीसारखं आमच्याकडेही लक्ष देतोय.” असं अजित पवार हसत म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील हे प्राजक्त तनपुरे यांचे नात्याने मामा आहेत, त्यावरही अजित पवारांनी मिस्कील भाष्य केले. “मामाची विकास निधीसाठी मदत घ्या, नाही तर माझाच मामा व्हायचा.” असं म्हणत अजित पवार हसले. दरम्यान, “कोरोनाचे सावट अजूनही दूर झालेले नाही. टप्प्याटप्प्याने सर्व सुरू करण्याचा प्रयत्न आहे. मोठ्या गर्दीचे कार्यक्रम टाळतोय. कोरोनाची काळजी घेत राज्याची वाटचाल सुरू आहे. कोरोनाचं संकट नसतं तर दुप्पट-तिपटीने पुढे गेलो असतो. तिन्ही पक्षांची विचारधारा वेगळी आहे. मात्र समान कार्यक्रमावर एकत्र आले.

भाजपच्या सत्तेच्या काळात दुजाभाव होत होता. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन केली. जीएसटीची रक्कम केंद्राकडे अडकून आहे. पगार, पेन्शनसाठी राज्याचे साडेबारा हजार कोटी खर्च होतात.” असं अजित पवार सांगत होते. “शेतकरी आंदोलनाला ‌केंद्राने गंभीरतेने घ्यायला हवे होते. शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता म्हणजे शरद पवार. शेतकरी कायद्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा. अण्णा हजारेंवर उपोषणाची वेळ आली. हे सरकार शेतकरीविरोधी आहे. शेतकरी मोडला तर देश मोडेल. शेतकरी ट्रॅक्टर परेडला हिंसक वळण लागलं. आपला शेतकरी कधीच हिंसा करत नाही. गालबोट लावण्यासाठी कोणी तरी शिरलं आणि आंदोलनास गालबोट लावण्याचा प्रयत्न यातून निश्चित झाला.” अशी शक्यताही अजित पवारांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER