ज्यांच्याकडे महाराष्ट्र सैनिकांची एवढी सुरक्षा आहे;त्यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार ; मनसे नेत्याचा टोला

Raj Thackeray - MNS

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कपात केल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे . मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray), माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपाच्या (BJP) अनेक नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने (Mahavikas Aghadi) घेतला आहे.

राज ठाकरेंची सुरक्षा व्यवस्था कमी केल्यानंतर मनसेच्या नेत्या रुपाली पाटील- ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. रुपाली पाटील फेसबुक पोस्टद्वारे म्हणाल्या की, ज्यांच्याकडे एवढी महाराष्ट्र सैनिकांची सुरक्षा आहे. त्यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार आहे. शेवटी महविकास आघाडी पण भाजपासारखी कुचक्या मनाचीच निघाली, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मनसेचे नेते किर्तीकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी देखील ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंवर जीव ओवाळून टाकणाऱ्या अगणित महाराष्ट्र सैनिकांच्या या सुरक्षा कवचात ना कधी कपात होऊ शकते, ना कुणी कधी भेदू शकतो, असं किर्तीकुमार शिंदे यांनी संगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER