येथून पैसा कमावणाऱ्यांना हरामखोर म्हणणार नाही; कंगनाचा संजय राऊतांना टोमणा

Kangana Ranaut & Sanjay Raut

नवी दिल्ली : सध्या हिमाचलप्रदेशात सुरू असलेल्या ‘भूत पुलिस’ चित्रपटाच्या शूटिंगवरून कंगनाने (Kangana Ranaut) तिला हरामखोर, नमकहराम म्हणणारे शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना टोमणा मारला – “सध्या हिमाचल मुंबईच्या अनेक फिल्म यूनिट्सचे होस्टिंग करत आहे. देवभूमी प्रत्येक भारतीयाची आहे आणि कुणी या राज्यातून पैसे कमवत असेल, तर त्याला ‘हरामखोर’ अथवा ‘नमकहराम’ म्हटले जाणार नाही. जर, असे कुणी म्हणत असेल तर, मी त्याची निंदा करते, बॉलिवूडप्रमाणे गप्प बसणार नाही.” कंगनाने ट्विटमध्ये ‘भूत पुलिस’ या चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित न्यूज आर्टिकल शेअर केले आहे.

राऊत कंगनाला म्हणाले होते हरामखोर
कंगना राणावतने गेल्या महिन्यात सुशांत सिंह राजपूत केसवरून मुंबई पोलिसांवर टीका केली होती. तिने संजय राऊतांवर तिला मुंबईमध्ये न येण्याची धमकी देण्याचा आरोपही केला होता. मुंबई पाकव्याप्त वाटते, असे म्हटले होते. कंगनाच्या ट्विटवरून संजय राऊतांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाला हरामखोर मुलगी म्हटले होते.

डलहौसीमध्ये सुरू आहे ‘भूत पुलिस’ची शूटिंग
सध्या पवन कृपलानी दिग्दर्शित हॉरर कॉमेडी फिल्म ‘भूत पुलिस’चे शूटिंग हिमाचलप्रदेशातील डलहौसी येथे सुरू आहे. यासाठी सैफ अली खान, अर्जुन कपूर, जॅकलीन फर्नांडिस, यामी गौतम आणि प्रोड्यूसर्स रमेश तौरानी आणि अक्षय राय हिमाचलप्रदेशात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER