ज्यांना उद्योग नाही ते असेल रिकामे मुद्दे उकरून काढतात ; अजितदादांचा चंद्रकांत पाटलांना टोला

Ajit Pawar - Chandrakant Patil

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यातील वाद चांगलेच पेटला आहे .

पहाटेच्या शपथविधी सोहळ्यावरून चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देत अजितदादा म्हणाले की, ‘ जी गोष्ट झालेली आहे, तिला चौदा महिने झाले आहे. आता ज्यांना उद्योग नाही ते असेल रिकामे मुद्दे उकरून काढतात’ असा टोला चंद्रकांत पाटील यांना लगावला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते .

मराठा आरक्षणावर काम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आजच्या दिवशी मराठा समाजाला मी अश्वस्त करतो इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचा प्रयत्न करत आहोत , अशी माहिती अजित पवार यांनी दिली.ही लोक काही काळ आमच्या बरोबर होती, त्यांचा आवाका किती आहे हे आम्हाला माहित आहे. त्यामुळे फार महत्व देत नाही. त्यामुळे भावनेच्या आहारी जाऊन काही जण बोलत असतील तर फार महत्त्व द्यायची गरज नाही , असे म्हणत अजित पवार यांनी विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील यांना टोला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button