ज्यांना श्रीराम कळलेच नाही, तर श्रीराम सेवा काय कळणार? भाजपाचा टोला

Devendra Fadnavis - Nana Patole

मुंबई :- देशभरात अयोध्येतील (Ayodhya) श्री राम मंदिराच्या (Ram Mandir) निर्माणासाठी भाजपकडून (BJP) निधी संकलन केले जात आहे. भाजपच्या या अभियानावर काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी टीका केली आहे. “भगवान श्री रामाच्या नावाखाली देणगी जमा करण्याचा ठेका भाजपला दिला आहे का? ते कोणत्या नियमाखाली देणगी जमा करत आहेत? राम मंदिराच्या नावाखाली टोलवसुली सुरू आहे.” असा आरोप नाना पटोले यांनी विधानसभेत केला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले.

नाना पटोले यांच्या आरोपानंतर विधानसभेत खळबळ उडाली. भाजप नेत्यांनी पटोलेंच्या आरोपावर आक्षेप घेत घोषणाबाजी सुरू केली आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांना सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातून बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेससह महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi) पक्षांवर जोरदार टीका केली. “श्रीराम मंदिर निर्माणासाठी निधी गोळा करणे, हे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना वसुली वाटते. ज्यांना कधी श्रीराम कळलेच नाहीत, त्यांना श्रीराम सेवा काय कळणार? खंडणीखोरांना समर्पण हे कधीच कळले नाही आणि कळणारही नाही.

श्रीराम हा आमचा धर्म आहे आणि कर्मही! ।। जय श्रीराम ।।” असे ट्विट भाजपाने केले.

नाना पटोलेंचा सवाल
राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना नाना पटोले यांनी भाजपसमोर प्रश्न उपस्थित केले. “राम मंदिराच्या नावाने टोलवसुली केली जाते. भाजपला हा अधिकार कोणी दिला? ज्याने राम मंदिरासाठी निधी दिला नाही त्याला त्रास दिला जातो, अशी तक्रारदेखील माझ्याकडे आली आहे. रामाच्या नावाने पैसे जमा करणारे हे लोक कोण? त्यांना ठेका दिलेला आहे का? केंद्र सरकारने याचे उत्तर द्यायला हवे.” असे नाना पटोलेंनी आक्रमकपणे सवाल उपस्थित केले.

ही बातमी पण वाचा : खंडणीबहाद्दरांना समर्पण काय समजणार, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER