केंद्राच्या नावाने बोटे मोडणार्‍यांनी हे वाचावेच – चंद्रकांत पाटील

CM Uddhav Thackeray-Chandrakant Patil

मुंबई :- सचिन वाझे (Sachin Vaze) आणि परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या पत्रावरून राज्यात राजकीय गदारोळ सुरू आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महाराष्ट्रातील मराठा आरक्षण या ज्वलंत मुद्द्यावरील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. या प्रश्नावरून भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सुनावणीतील युक्तिवादाचा हवाला देत ठाकरे सरकारला (Thackeray Government) टोमणा मारला.

मराठा आरक्षण (Maratha Reservation) याचिकांवर पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. सुनावणीतील युक्तिवादाचा हवाला देत चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले – देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री असताना गेल्या कित्येक वर्षांचा मराठा आरक्षणाचा तिढा सुटला. मराठा आरक्षणाच्या कायद्याला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात भक्कम पाठिंबा दिला. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी सतत केंद्राच्या नावाने बोटे मोडणार्‍यांनी हे आवर्जून वाचले पाहिजे.

राज्य सरकारला असा कायदा करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि हा कायदा सांविधानिक आहे. हाही भक्कम युक्तिवाद केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला. कर्तव्यशून्य, अपयशी आणि कोणत्याच गोष्टीकडे गांभीर्याने न पाहणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या डोळ्यात हे झणझणीत अंजन आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे.

…थोडे तरी स्वकर्तृत्व दाखवा
या सरकारच्या मनात थोडी जरी लाज शिल्लक असेल तर आता तरी केंद्र सरकारच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा स्वत:चे कर्तृत्व दाखवा. भलेही फसवणुकीने तुम्ही सत्तेत आले असाल! आता आलाच आहात तर थोडे तरी स्वकर्तृत्व दाखवा, असाही टोमणा पाटील यांनी मारला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER