आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांनी शैक्षणिक आरक्षण सोडण्याची तयारी ठेवावी – प्रीतम मुंडे

मुंबई :– अधिक गरजू व गरीब विद्यार्थ्यांना आरक्षणाचा फायदा होण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या लोकांनी शिष्यवृत्ती, शैक्षणिक आरक्षणाचा लाभ सोडण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे- खाडे यांनी केले.

उज्ज्वला योजनेद्वारे अनेक श्रीमंत व्यक्तींनी स्वयंपाकाच्या गॅसची सबसीडी सोडली. त्याचा समाजाला लाभच झाला. शासनाने केलेल्या आवाहनाला तो प्रतिसाद होता. त्याप्रमाणे आगामी काळात सधन व्यक्तींनी त्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा त्याग केला तर समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मिळू शकेल.