‘लस घेण्यास पात्र असणाऱ्यांनी…” शरद पवारांचे व्हिडीओच्या माध्यमातून आवाहन

Sharad Pawar - Coronavirus Vaccination

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात कोरोनाची (Corona) लस (Vaccine) घेतली आहे. यासंदर्भात पवार यांनी सोशल नेटवर्किंगवरुन या लसीकरणासंदर्भातील व्हिडीओ पोस्ट करत माहिती दिली.

आज मुंबईतील जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. आजपासून तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ही लस घेण्यास पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करतो, असे पवार यांनी लस घेतानाचा व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER