नृत्य येत नसतानाही अनेक हिट गाणी दिली या नायकांनी

those successful actors who don't know dance

स्वर्गीय दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांनी भारतात चित्रपटसृष्टीची मुहुर्तमेढ रोवली. आज हिंदी चित्रपटसृष्टीने साता समुद्रापार आपले नाव गाजवले आहे. भारतीय चित्रपटांमधील सगळ्यात महत्वाचा आणि आवश्यक घटक म्हणजे संगीत. त्यामुळे चित्रपटात नायिका घेताना तिला डांस येतो की नाही ते अगोदर पाहिले जाते. मात्र नायकांसाठी ही अट नाही. त्यामुळे सुरुवातीच्या काऴात डांस न येणारे नायक सर्रास दिसत. आता मात्र ऋतिक रोशन, शाहिद कपूर, टायगर श्रॉफ असे नायक आहेत जे उत्कृष्ट डांसही करतात. दक्षिणेत तर जवळ जवळ सगळेच नायक उत्कृष्ट डांसर आहेत. बॉलिवुडमध्ये मात्र असे अनेक नायक आहेत ज्यांना डांस बिलकुल येत नाही. तरीही त्यांनी अनेक हिट गाणी दिली आहेत. केवळ चेहऱ्याच्या अभिनयाने किंवा एक-दोन स्टेप्स दाखवून या नायकांनी वेळ मारून नेलेली आहे.

आपण चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीचा काळ सोडून देऊ कारण तेव्हा नायक नाचतच नसे. त्यामुळे अगदी भारतभूषणपासून राज कपूरपर्यंत डांस न येणारे अनेक नायक होते. पहिला डांसिग स्टार म्हणजे शम्मी कपूर. मात्र त्याचे नृत्यही कलात्मक नव्हते तर अंग वेडेवाकडे करून नाचणे त्याचे वैशिष्ट्य होते आणि ते प्रेक्षकांनाह आवडतही होेते. राजेश खन्ना

बॉलीवुडचा (Bollywood) सुपरस्टार. त्याच्या देखणेपणावर आणि अभिनयावर मुली फिदा असत. राजेश खन्नाने शेकड्याने हिट गाणी दिलेली आहेत. पण राजेश खन्नाला नाचता येत नव्हते. त्याच्याकडे दोन-चार स्टेप्सच होत्या आणि त्याच तो प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या पद्धतीने दाखवत असे. यानंतर धर्मेंद्रचे नाव घेता येईल, बॉलिवुडचा हा हीमॅन नाचात फारच कमजोर होता. पण तरीही धर्मेंद्रनेही (Dharmendra) शेकड्याने हिट गाणी दिली आहेत. त्याचा नाच म्हणजे फक्त हात पाय उडवणे असे. मात्र त्याची ही स्टेपही प्रचंड लोकप्रिय झाली होती. नाना पाटेकरही बॉलिवुडमधील हिट नायक. पण नानालाही डांस येत नसे. काही चित्रपटांमध्ये त्याला नाचवण्याचा प्रयत्न झाला. पण तो प्रयत्न फारच हास्यास्पद ठरला. नानालाही आपली उणिव ठाऊक असल्याने त्यानेही कधी डांसचा आग्रह धरला नाही.

धर्मेंद्रप्रमाणे सनी देओललही डांस येत नाही. मात्र बॉबी देओल एक चांगला डांसर आहे. सनी देओलने पहिल्या चित्रपटापासूनच हिट गाणी देण्यास सुरुवात केली. पण पडद्यावर कधी तो कधी डांस करण्याच्या भानगडीत पडला नाही. डांस डायरेक्टरही सनीला एक दोन स्टेप्स दाखवून मोकळा सोडत असत. डांस येत नसल्याची खंत सनीने एकदा व्यक्तही केली होती. पण डांस येत नसल्याची कसर त्याने स्टंटमधून भरून काढली होती.

90 च्या दशकात अनेक नवीन नायकांचा उदय झाला. त्यात गोविंदा, अक्षय कुमार, सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांचा समावेश होता. गोविंदा आणि अक्षय उत्कृष्ट डांसर असले तरी सुनील शेट्टी मात्र डांसमध्ये अत्यंत कच्चा होता. सुरुवातीला तर त्याच्या अभिनयावरही बोट ठेवले गेले. तरीही सुनीलने अनेक हिंदी चित्रपट केले. त्याच्या नावावरही अनेक हिट गाणी आहेत. त्याला डांस येत नसतानाही त्याने डांस करण्याचा प्रयत्न काही गाण्यांमध्ये केला पण तो हास्यास्पदच ठरला. पण तरीही सुनीलचे काहीही अडले नव्हते.

संजय दत्तने जरी बॉलिवुडमध्ये रॉकी या संगीतमय चित्रपटातून सुरुवात केली असली तरी संजय दत्तला नाचवणे फार कठिण आहे. तो डांस करण्याचा प्रयत्न करतो पण त्यात त्याला किती त्रास होतो हे गाणी पहाताना त्याच्या चेहऱ्यावर दिसून येते. स्वर्गीय डांस डायरेक्टर सरोज खान यांनी संजय दत्तला डांस येत नाही पण त्याला शिकवणे सोपे आहे. एक दोन स्टेप्स सांगितल्या की तो त्या व्यवस्थित करतो आणि नंतर पुढे पूर्ण गाणे शूट करता येते असे सांगितले होते.

अनिल कपूरने (Anil Kapoor) बॉलिवुडमध्ये अनेक हिट चित्रपट आणि अनेक हिट गाणी दिली आहेत. पण त्यालाही नाचता येत नाही हे फार कमी जणांना ठाऊक आहे. असे असले तरी त्याने माय नेम इज लखनसारखी अनेक हिट गाणी दिली आहेत. आणि प्रेक्षकांना त्याचा हा डांस आवडलाही आहे.

याशिवाय अजय देवगन, जॉन अब्राहम असेही काही हिट नायक आहेत ज्यांची गाणी हिट झाली आहेत पण या दोघांनाही डांस येत नाही. त्यामुळे बॉलिवुडमध्ये नायक बनण्याचे स्वप्न पाहाणाऱ्या एखाद्याला डांस येत नसेल तर तरी त्याने काळजी करू नये. फक्त चांगला अभिनय केला तरी त्याची ही उणिव झाकून जाते. हे या नायकांच्या उदाहरणावरून लक्षात ठेवावे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER