शिवसेनेत गेलेले ते नगरसेवक अपात्र ठरतील; गिरीश महाजनांचा दावा

Girish-Mahajan-1

जळगाव : दोन दिवसांपूर्वी शिवसेनेने (Shivsena) मुक्ताईनगर येथील भाजपच्या (BJP) काही नगरसेवकांना पक्षात घेत भाजपला मोठा धक्का दिला. या नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र यावर प्रतिक्रिया देताना ते नगरसेवक अपात्र ठरतील, असा दावा महाजन यांनी केला आहे. तसेच पैशाचे आमिष दाखवून भारतीय जनता पक्षाचे जळगाव व मुक्ताईनगरचे नगरसेवक फोडण्यात आले; मात्र जनता त्यांना निश्चित धडा शिकवेल, असा हल्लाबोल महाजन यांनी शिवसेनेवर केला आहे.

महाजन म्हणाले की, राज्यातील सत्तेच्या बळावर शिवसेना नगरसेवकांवर दबाव आणत आहे, तसेच नगरसेवकांना पैशाचे आमिष दाखवून त्यांचे पक्षांतर करून घेत आहे. भारतीय जनता पक्षात असल्यामुळे जनतेने या नगरसेवकांना निवडून दिले. आता मात्र त्यांनी पक्ष सोडला आहे, जनता आजही आमच्यासोबत असून आगामी काळात जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. मुक्ताईनगर येथील नगरसेवक फुटले असल्याने त्यांना शिवसेनेने सत्तेच्या बळावर अपात्रतेची भीती दाखवली, तसेच काही नगरसेवकांना पैशाचे आमिष दाखवले, असा आरोपही महाजन यांनी केला.

भारतीय जनता पक्ष सोडून गेलेले सर्व नगरसेवक पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र ठरतील असा दावाही महाजन यांनी केला.  ते म्हणाले, भाजपने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, लवकरच त्याना नोटीस बजावण्यात येईल. नगरसेवक फुटल्याने जिल्ह्यात भाजप कमजोर होत असल्याच्या चर्चेस  फेटाळून लावत महाजन म्हणाले, पक्षाला काहीही फरक पडणार नाही, पक्ष मजबूत आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजप निश्चित आपली ताकद दाखवून देईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button