अॅट्रॉसिटीचा दुरुपयोग करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायीच नाही – मुख्यमंत्री

cm-fadnavis

नागपूर : अॅट्रोसिटी कायद्याचा काही जणांकडून दुरुपयोग केला जात असल्यामुळे या कायद्यात फेरबदल करण्याची मागणी होत आहे, परंतु या कायद्यात कुठलाच फेरबदल करूच शकणार नाही, असं मत शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

कोणी अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग करत असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायीच नाही.
तो संबंधित जातीचा नक्की असेल, पण बाबासाहेब आंबेडकर यांचा तो अनुयायी असूच शकत नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले

यावेळी बोलताना ते म्हणालेत अॅट्रॉसिटी कायदा रद्द तर करता येणारच नाही. पण त्यामध्ये फेरबदलही करता येणार नाहीत.