‘त्या’ प्रेमवीरांना विद्यापीठ परिसरात प्रवेशबंदी

Pakistan Female Student Proposing

लाहोर : पाकिस्तानमध्ये (Pakistan) लाहोर (Lahore) विद्यापीठात जाहीर प्रेम प्रदर्शन करणाऱ्या प्रेमी आणि प्रेमिकेला विद्यापीठाने शिस्तभंग केल्याच्या आरोपात विद्यापीठातून काढले. त्यांच्यावर विद्यापीठाच्या परिसरात प्रवेश करण्याला बंदी टाकली. यावरून सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे.

घटना अशी की, एका विद्यार्थिनीने तिच्या वर्गात शिकणाऱ्या सोबत्यासाठी विद्यापीठाच्या प्रांगणात इतर विध्यार्थ्यांच्या उपस्थितीत, हातात फुलांचा गुच्छ घेऊन, टोंगळ्यावर झुकून जाहीरपणे नाट्यमय रीतीने प्रेम व्यक्त केले. तिच्या प्रियकराने पुष्पगुच्छ स्वीकारून, तिला आलिंगन देत तिच्या प्रेमाचा स्वीकार केला. तिथे हजर विद्यार्थ्यांनी आनंदाचा गजर करत त्यांना प्रोत्साहन दिले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

लाहोर विद्यापीठाने यावर कारवाई करत त्या दोघांना शिस्तभंग केल्याच्या आरोपात विद्यापीठातून काढून टाकले. विद्यापीठाने म्हटले आहे की, या विद्यार्थ्यांचे वर्तन बेशिस्त आणि विद्यापीठाच्या नियमांचे उल्लंघन करणारे आहे.

विद्यापीठाच्या या कारवाईवर सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे. काही युजरने यावर टीका केली. एका नेटीजनने म्हटले आहे की, तुम्ही मारहाण करू शकता. गैरवर्तन करू शकता. बलात्कार करू शकता. पण, जेव्हा प्रेमाचा विषय येतो तेव्हा ते म्हणतात, हे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आहे. जाहीरपणे कुणाबद्दल प्रेम प्रदर्शन करण्यात चूक काय आहे?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER