‘त्या’ ३६ ब्रिटिश खासदारांना अजूनही भारतावर राणीचे राज्य आहे असे वाटत असावे – भातखळकर

Atul Bhatkhalkar

मुंबई : भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ब्रिटनमधील ३६ खासदारांनी पाठिंबा दिला व पंजाबच्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ परराष्ट्र मंत्रालय आणि यूकेच्या कार्यालयांमार्फत भारत सरकारशी चर्चा करावी, अशी मागणी केली. या खासदारांच्या मागणीवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली, त्या खासदारांना अजूनही भारतावर इंग्लंडच्या राणीचे राज्य आहे, असे वाटत असावे. ब्रिटनमधील लेबर पार्टीचे खासदार तनमनजित सिंग धेसी यांच्या नेतृत्वाखाली ३६ ब्रिटिश खासदारांनी युनायटेड किंगडमचे सचिव डोमिनिक राब यांना याबाबत पत्र लिहिले. कृषी कायद्यांविरोधात भारतावर दबाव टाकण्याची मागणी केली.

पंजाबच्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ परराष्ट्र मंत्रालय आणि यूकेच्या कार्यालयांमार्फत भारत सरकारशी चर्चा करावी, असे खासदारांच्या गटाने रॉब यांना सुचवले आहे. यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट केले, “भारतात चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत चिंता व्यक्त करणारे पत्र लिहिणार्‍या ३६ ब्रिटिश खासदारांना अजूनही भारतावर इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीचे राज्य असल्याचे वाटत असावे. आमचे प्रश्न सोडवण्यास आम्ही समर्थ आहोत.

जंटलमन, माइंड युअर ओन बिझनेस.” गेल्या महिन्यात अनेक खासदारांनी आपल्याला तसेच लंडनमधील भारतीय उच्चायोगाला भारतातील शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या तीन कृषी कायद्यांबाबत लिहिलं होतं. केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात आणलेले हे तीन कृषी कायदे शेतकऱ्यांचे शोषण थांबवणे आणि त्यांच्या पिकांना योग्य मोबदला देण्यास अपयशी ठरल्याबद्दल देशभरात व्यापक स्वरूपात शेतकरी निषेध आंदोलन करत आहेत,  असं तनमनजित सिंग म्हणाले.

या खासदारांनी दिले समर्थन

भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना ज्या ब्रिटिश खासदारांनी पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत, त्यामध्ये डेबी अब्राहम, मार्टिन डॉकर्टी ह्युजेस, एलन डोरांस, अँड्रूयू ग्वेने, अफजल खान, इयान लावेरी, इमा लावेरी, क्लाइव लेविस, टोनी लॉयड, खालिद महमूद, सीमा मल्होत्रा, स्टीव मॅककेब, डॉन मैकडोनेल, पॅट मॅकफेडेन, ग्राहम मोरिस, कार्लेइन नॉर्स आदींचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER