
बेळगाव : महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने कर्नाटक सरकारने आज दुपारी पासून महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्वांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनधारक आणि नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग सुरू झाले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कोरोना तपासणी चेक पोस्ट उभे केले आहेत. कर्नाटक राज्यात येणाऱ्या सर्व वाहनधारकांना तपासणी करून पुढे सोडले जात आहे.
कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावर देशभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात रोज हजारोंच्या संख्येने नवे कोरोना रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. देशभरातील कोरोना रुग्णांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्ण अधिक आढळून आले आहेत. त्यामुळे कर्नाटक सरकारने सीमेवर पुन्हा कोरोना चेक पोस्ट सुरू केले आहेत. तपासणीशिवाय राज्यात प्रवेश देऊ नका आशा सूचना सरकाने दिल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यासह पोलिसांकडून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकावर लक्ष असणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला