मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला फटकारल्यावर थोरातांनी दिले प्रत्युत्तर

Uddhav Thackeray - Balasaheb Thorat

पुणे :- महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) औरंगाबादचं संभाजीनगर (Sambhaji Nagar) असं नामांतर करण्यास विरोध असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेची (Shiv Sena) कोंडी झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर औरंगाबादचा उल्लेख मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकृतपणे संभाजीनगर असा केला जात आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) प्रतिक्रिया देताना समर्थन दिलं आणि काँग्रेसलाच टोला लगावला होता. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबाद (Aurangabad) नामांतराबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका कायम असून ती आम्ही मांडली आहे; पण मुख्यमंत्र्यांना नेमकं काय म्हणायचं आहे त्याबाबत आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना निश्चित पटवून देऊ, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

औरंगजेब हा विषय नाही. छत्रपती संभाजी महाराज हे आमचेही आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान आहेत. पण प्रश्न असा आहे की, नामांतराच्या बाबतीत जे राजकारण होतं त्यामुळे माणसात भेद निर्माण होतात. ते होऊ नये म्हणून काँग्रेस विरोध करत असल्याचं थोरातांनी सांगितलं.

दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नामांतरावर ठाम असून, त्यांनी आता थेट मंत्रिमंडळापुढे नामांतराचा प्रस्ताव ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा याला विरोध असताना असा प्रस्ताव आणला जात असेल तर त्यामागे शिवसेनेची मोठी राजकीय खेळी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही बातमी पण वाचा : औरंगजेब सेक्युलर नव्हता, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला सुनावले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER