औरंगाबादच्या नामांतराविरोधात थोरात आक्रमक, शिवसेनेला ठणकावत म्हणाले…

Uddhav Thackeray - Balasaheb Thorat

मुंबई : काँग्रेसचा (Congress) कोणत्याही शहराच्या नामांतराला विरोधच आहे, महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) ध्येय सर्वसामान्यांचं कल्याण करणं हेच आहे, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नामांतर करुन राजकीय वातावरण बिघडायला नको, अशी काळजी थोरातांनी व्यक्त केली. त्यामुळे औरंगाबादचे (Aurangabad) संभाजीनगर (Sambhajinagar) असे नामांतर करण्याच्या तयारीत असलेल्या ठाकरे सरकारला (Thackeray Government) आघाडीतील मित्रपक्षाकडूनच विरोध होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

छत्रपती संभाजी महाराज विमानतळाबाबतचा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे. आता केंद्र सरकार आणि भाजपची (BJP) जबाबदारी आहे. शहराची नावं बदलून सर्वसामान्यांच्या जीवनात काही बदल झाला का? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी विचारला.

सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या आनंदासाठी काम करावं, तेढ निर्माण करण्याचं काम नको. आमचा सत्तेत समान वाटा आहे. काँग्रेसचा कोणत्याही शहराच्या नामांतराला विरोधच आहे, महाविकास आघाडीचं ध्येय सर्वसामान्यांचं कल्याण करणं आहे. सर्वसामान्य जनता आनंदी राहावी हेच काँग्रेसचं ध्येय आहे. तीन पक्षांमध्ये मतमतांतरं होऊ शकतात, पण याचा सरकारवर काहीही परिणाम नाही. चर्चेने सर्व प्रश्न सोडवू. संजय राऊत यांनी तिन्ही पक्ष एकत्र कसे राहतील, याची अग्रलेखातून काळजी घेतली, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER