यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर नाही, मुख्यमंत्री ऑनलाईन मार्गदर्शन करणार

Shiv Sena - Dussehra Rally

मुंबई : दसऱ्याच्या (Dussehra) दिवशी दिवंगत शिवसेना (Shiv Sena) प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे भाषण ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने शिवाजी पार्कवर (Shivaji Park) गर्दी जमत असे. शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्क येथे झाला होता. पक्षाचा वार्षिक दसरा मेळावा हा नवरात्रातील मुंबईतील सर्वात प्रसिद्ध कार्यक्रमांपैकी एक होता. मात्र यंदाचा यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार नसल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

कोरोनाचा (Corona) वाढत असलेला संसर्ग बघता गर्दी टाळण्यासाठी यंदा शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेणार नसल्याची माहिती पुढे आली आहे. यंदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार असल्याचे शिवसेनेतील काही उच्चपदस्थांनी सांगितले आहे. त्यासाठी शिवसेनेच्या डिजिटल टीमकडून कार्यक्रमाची आखणी करण्यात येत आहे. याची आखणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यंदा 19 जून रोजी शिवसेनेचा स्थापना दिवसही ऑनलाईन पद्धतीनेच साजरा करण्यात आला होता. यावेळी, मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER