आवेश खानसाठी स्वप्नपूर्तीचे ठरतेय यंदाचे आयपीएल

avesh khan - Maharashtra Today
avesh khan - Maharashtra Today

विराट कोहली आणि महेंद्रिसंग धोनी..या दोघांना बाद करणे कोणत्याही गोलंदाजाचे स्वप्न असते. आयपीएलच्या (IPL) इतिहासात या दोघांची दांडी उडवणारा एकच गोलंदाज आहे तो म्हणजे आवेश खान (Avesh Khan), दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) हा जलद गोलंदाज यंदाच्या आयपीएलमध्ये धूम करतोय. त्याने धोनीला आपल्या दुसऱ्याच चेंडूवर तर कोहलीला आपल्या सहाव्याच चेंडूवर चक्क त्रिफळबाद केले.

यंदाच्या आयपीएलमधील त्याच्या ह्या विकेट पहा म्हणजे आवेश खान कशी धूम करतोय याची कल्पना येईल…

  • डूप्लेसीस-पहिलाच चेंडू
  • धोनी -दुसरा चेंडू
  • बेयरस्टो- दुसरा चेंडू
  • पुरन- दुसरा चेंडू
  • एसके यादव- दुसरा चेंडू
  • कोहली- सहावा चेंडू

यामुळे तो लक्ष वेधून घेत असून त्याचे जे आवडते आणि आयडॉल खेळाडू आहेत, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डीविलीयर्स यांच्याकडून कौतुकासह त्याने त्यांचा ऑटोग्राफही मिळवला आहे.

आवेश हा मूळचा इंदूरचा! वय २४. दिल्लीच्या चेन्नईवरील विजयात त्याने धोनी व डू प्लेसीस यांच्या काढलेल्या विकेट महत्त्वाच्या ठरल्या होत्या. तीन वर्षांपूर्वीच त्याने धोनीची विकेट मिळवली असती पण क्षेत्ररक्षकाला झेल टिपता आला नव्हता. यावेळी त्याने क्षेत्ररक्षकाची गरजच ठेवली आहे आणि दुसऱ्याच चेंडूवर धोनीची दांडी उडवली. आणि त्यानंतरच त्याचा आनंद अवर्णनीय होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button