काश्मीर खो-यातील दहशतवाद्यांच्या खात्म्याचे हे अखेरचे वर्ष : जितेंद्र सिंह

Jitendra Singh

नवी दिल्ली :- काश्मीर खो-यात दहशतवाद्यांच्या खात्म्याला घेऊन केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी एक मोठा दावा केला असून त्यांनी म्हटले आहे. खो-यात दहशतवाद्यांचे हे शेवटचे वर्ष आहे. यावर्षी काश्मीरातून दहशतवाद्यांचा सफाया होईल. केंद्रीय मंत्र्यांचे हे वक्तव्य ऐन अमरनाथ यात्रेच्या दरम्यान आले आहे.

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरातील दहशतवादाला निपटण्यासाठी तज्ञ समजले जाणारे अधिकारी अधिकारी फारूख खान यांना काश्मीरला पाठविले आहे. सध्या ते लक्षद्वीप येथे कार्यरत आहे. खान हे काश्मीरच्या राज्यपालांना सहकार्य करतील.

ही बातमी पण वाचा : अमित शाह यांनी मिशन काश्मीरसाठी पाठविले या विशेष अधिका-याला

ही बातमी पण वाचा : तुम्हाला एकावेच लागले ; अमित शाहांनी सुनावले औवेसींना खडेबोल