यंदा अमिताभ बच्चन आणि एकता कपूरची दिवाळी पार्टी नाही

Amitabh Bachchan - Ekta Kapoor

दिवाळीच्या (Diwali) दिवसात प्रख्यात अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) एक भव्य पार्टी देतात. या पार्टीला बॉलिवूडचे (Bollywood) अनेक कलाकार येत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून अमिताभची दिवाळी पार्टीची परंपरा सुरु आहे. अमिताभसोबतच जितेंद्रच्या घरीही दिवाळीची मोर्ठी पार्टी असते. जितेंद्रसोबतच एकता कपूरनेही (Ekta Kapoor) या दिवाळी पार्टीत लक्ष घालण्यास सुरुवात केली होती. या दोघांच्या दिवाळी पार्टीची बॉलिवूड वाट पाहात असते. परंतु यंदा या दोघांनाही दिवाळी पार्टी न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे कारण जसे कोरोना आहे तसेच प्रख्यात अभिनेता ऋषी कपूर यांचे निधनही आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषी कपूरच्या निधनामुळे आणि कोरोनाची (Corona) साथ लक्षात घेऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी अमिताभ आणि एकताने दिवाळी पार्टी रद्द केली आहे. अमिताभचे पूर्ण कुटुंब कोरोनाने ग्रासले होते. त्यामुळे फक्त कुटुंबियांसोबतच दोघांनीही दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऋषी कपूर अमिताभचा फक्त चांगला मित्रच नव्हता तर दूरचे नातेवाईकही आहेत. अमिताभची मुलगी श्वेता बच्चनने ऋषी कपूरचा भाचा निखिल नंदाशी लग्न केले आहे. जितेंद्र आणि ऋषी कपूरचीही चांगलीच मैत्री होती आणि एकता कपूरही ऋषी कपूरला घरातील एक सदस्य मानत असे त्यामुळेच एकतानेही दिवाळी पार्टी न देण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER