पंतप्रधान मोदींसोबत सावलीसारखी राहलेली ही दुभाषी आयएफएस महिला अधिकारी

Woman IFS officer

चेन्‍नई :- पंतप्रधान नरेद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपतीशी जिनपिंग यांच्या दोन्ही देशांदरम्यानच्या संबंधांबाबत तामिळनाडूच्या महाबलीपुरममधील दोन दिवसांच्याअनौपचारिक बातचीत झाली. या दौ-यादरम्यान हिंदी भाषेत सहज संवाद साधणारे पंतप्रधान मोदी यांनी मंदारिन भाषा बोलणा-या चीनला राष्ट्रपतींशी झालेल्या चर्चेच्यावेळी येत असलेली अडचण भारताच्या एका महिला आयएफएस अधिका-याने चुटकीसरशी सोडवली. या आयएफएस अधिकाऱ्याचे नाव आहे प्रियांका सोहानी.

आयएफएस प्रियांका सोहानी मोदींसोबत दोन दिवस पंतप्रधान मोदींसोबत सावलीसारख्या राहिल्या. राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी मंदारिन भाषेत बोललेल्या वाक्यांचा हिंदीत अनुवाद केला. अशाचप्रकारे पंतप्रधान मोदींनी हिंदीत बोललेल्या वाक्यांचा मंदारिनमध्ये अनुवाद केला. शी जिनपिंग यांनी अनेक वेळ पंतप्रधान मोदींकडून भारतीय संस्कृती आणि प्रतिकांबद्दल माहिती घेतली. यावेळी सोहानी यांनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांना समजण्यास मदत केली.

ही बातमी पण वाचा : पंतप्रधान मोदींनी समुद्रकिनाऱ्यावर गोळा केला प्लास्टिकचा कचरा

2012 बॅचच्या आयएफएस अधिकारी असलेल्या प्रियांका सोहानी या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्‍ट्रपती शी जिनपिंग यांच्यातील अनौपचारिक परंतु अतिशय महत्त्वाच्या बातचीतदरम्यानही उपस्थित होत्या. प्रियांका सोहानी यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या बेस्‍ट ट्रेनी ऑफिसरचे सुवर्ण पदकही जिंकले आहे. उत्तम कामगिरीसाठी तत्‍कालीन परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यांनी प्रियांका सोहानी यांना बिमल सान्‍याल पुरस्‍काराने सम्‍मानित केले होते.

प्रियांका 2016 पासून चीनमधील भारतीय दूतावासात आहेत. परराष्ट्र धोरणाचा हा काळ फारच व्यापक असून वेगाने बदलत आहे. यामध्ये अधिकाऱ्यांना कायमच तयारी करण्याची गरज असते, असे प्रियांका सोहानी म्हणतात. त्यांनी यूपीएससी परीक्षेत 26 वे स्थान मिळवले होते, तर महाराष्‍ट्रातून तिसऱ्या स्थानावर होत्या.