‘ह्या’ महिला क्रिकेटपटूने आईपाठोपाठ बहिणीला गमावले

veda krishnamurthy - Maharashtra Today

कोरोना (Corona) लाटेने कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. यात भारताची आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्ती (Veda Krishnamurthy) हिचे कुटुंबही आहे. कोरोनापायी 15 दिवसांपूर्वी तिने आपली आई चेलुवाम्बा देवी (Chelumbava Devi) यांना गमावले आणि आता गुरुवारी तिची बहिण, वत्सला शिवकुमार (Vatsala Shivkumar) हीसुध्दा तिला सोडून गेली आहे. यात दुर्देवी योगायोगाची बाब ही की भारतीय महिला संघाची ही अष्टपैलू खेळाडू सोशल मीडियावर इतरांसाठी वैद्यकीय व इतर मदतीचे आवाहन करत होती. वेदाने भारतासाठी 48 वन डे आणि 76 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

24 एप्रिल रोजी ती मातृप्रेमाला पारखी झाली आणि वेदानेच ही बातमी सोशल मीडियाद्वारे दिली होती. त्याचवेळी तिने आपली 45 वर्षीय बहिण वत्सला शिवकुमार हिचासुध्दा जगण्यासाठी संघर्ष सुरू असल्याचे जाहीर केले होते. दुर्देवाने चिकमंगळुरु येथे एका खासगी दवाखान्यात उपचार घेताना गुरूवारी तिचा हा संघर्ष संपला.

अम्मा गेल्यानंतर मला धीर देणारे आणि माझी सांत्वना करणारे संदेश दिल्याबद्दल धन्यवाद. तिच्याशिवाय माझे कुटुंबच नाही. माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे आणि कृपया आपण यासमयी आम्हाला एकटे राहू दिल्यास बरे होईल. माझ्यासारख्याच दुःखातून जात असलेल्यांसाठी माझ्या सहवेदना आणि प्रार्थना असे वेदाने आपल्या 24 एप्रिलच्या संदेशात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button