‘यास’ चक्रीवादळ भीषण रूप घेणार; पंतप्रधान मोदींनी घेतली महत्त्वाची बैठक

PM Modi - Maharashtra Today

मुंबई : ‘यास’ चक्रीवादळ हे २६ मे रोजी संध्याकाळपर्यंत पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या उत्तर किनारपट्टीला धडकेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित राज्ये, केंद्रीय मंत्रालय आणि संस्थांच्या तयारीचा आढावा (cyclone yaas ) घेतला. यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत अनेक मंत्री आणि अधिकरी उपस्थित होते.

समुद्रकिनाऱ्यावरील नागरिक, उद्योगांशी संपर्क करावा आणि त्यांना संवेदनशील बनवून मदत आणि बचाव कार्यासाठी तयारी करावी. किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवावं, असे निर्देश पंतप्रधान मोदींनी दिले. वीज पुरवठा आणि टेलिफोन यंत्रणा बंद करण्याचा कालावधी हा कमी-कमी ठेवण्याची सूचनाही मोदींनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांशी आणि आज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रतिनिधी, दूरसंचार, वीज, हवाई वाहतूक आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सचिवांसह बैठक करत आहेत. बंगालच्या खोऱ्यात बंगालच्या उपसागराच्या मध्य पूर्वी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. ही स्थिती उद्या म्हणजे २४ मेपर्यंत चक्रीवादळाचं रूप घेणार आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button