
वेस्ट इंडिजविरुध्दच्या (West Indies) दुसऱ्या कसोटीत शेमा ब्रुक्सचा वॅग्नरच्या (Neil Wagner) गोलंदाजीवर झेल घेऊन न्यूझीलंडचा यष्टीरक्षक ब्रॅड वॉटलिंग (Brad Watling) हा विशेष यष्टीरक्षकांच्या (Wicketkeeper) पंक्तीत जाऊन बसला आहे. वॅग्नरच्या गोलंदाजीवरील हा त्याचा 50 वा झेल होता. याआधी त्याने टीम साउथी व ट्रेंट बोल्ट यांच्या गोलंदाजीवर 50 पेक्षा अधिक फलंदाजांना बाद केले आहे. याप्रकारे कसोटी सामन्यांमध्ये तीन किंवा अधिक गोलंदाजांच्या गोलंदाजीवर 50 पेक्षा अधिक फलंदाजांना टिपणारा तो केवळ तिसरा यष्टीरक्षक ठरला आहे.
याबाबतीत दक्षिण आफ्रिकन यष्टीरक्षक मार्क बाऊचर (Mark Boucher) आघाडीवर आहे. बाउचरने तब्बल पाच गोलंदाजांच्या गोलंदाजीवर यष्टीमागे 50 पेक्षा अधिक फलंदाजांना टिपले आहे. ते गोलंदाज आणि बाऊचरची कामगिरी अशी….
मखाया एन्टीनी – 84
शाॕन पोलाॕक —– 79
जेकस् कॕलिस — 69
डेल स्टेन ———- 58
अॕलन डोनाल्ड — 53
आॕस्ट्रेलियन तडाखेबंद फलंदाज व चपळ यष्टीरक्षक अॕडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) याने चार गोलंदाजांच्या गोलंदाजीवर यष्टीमागे 50 पेक्षा अधिक गडी टिपले आहेत. ते गोलंदाज व गिलख्रिस्टची कामगिरी अशी…
ग्लेन मॕकग्रा —- 90
ब्रेट ली ———- 81
शेन वाॕर्न ——– 59
जेसन गिलेस्पी – 58
आणि आता ब्रॕड वाॕटलिंग याने तीन गोलंदाजांच्या गोलंदाजीवर बळी टिपण्याचे अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याची ही कामगिरी अशी…
टीम साऊथी —– 71
ट्रेंट बोल्ट ——— 52
नील वॕगनर —— 50
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला