
जवळ जवळ 11 वर्षानंतर अभिनेत्री पूजा भट्ट (Pooja Bhatt) अभिनय करताना दिसणार आहे. मात्र यावेळी पूजा मोठ्या पडद्यावर दिसणार नसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. 2009 मध्ये पूजा भट्ट ‘सनम तेरी कसम’ सिनेमात दिसली होती. या सिनेमात सैफ अली तिचा नायक होता. शीबा आणि अतुल अग्निहोत्री यांच्याही या सिनेमात दिसले होते. विशेष म्हणजे हा सिनेमा 1994 ला तयार झाला होता, पण न्यायालयीन खटल्यामुळे सिनेमा रिलीज करण्यावर 15 वर्षे बंदी घालण्यात आली होती. पूजा भट्ट आता आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजेच सोमवार 8 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर ‘बॉम्बे बेगम्स’ शोमधून आगमन करणार आहे. या शोच्या निमित्ताने पू्जाने पत्रकारांशी नुकत्याच गप्पा मारल्या. यावेळी पूजानs तिच्या पहिल्या किसिंग सीनविषयी माहिती दिली.
पूजा भट्टने वयाच्या सतराव्या वर्षी ‘डॅडी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पूजा भट्टचा सडक सिनेमा आला जो सुपरहिट झाला होता. याच सिनेमात पूजाने तिच्या करिअरमधला पहिला किसिंग सीन दिला होता आणि तो ही संजय दत्तला. विशेष म्हणजे या सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक होते तिचे वडील महेश भट्ट. पूजा सांगते, सिनेमात माझा किसिंग सीन होता. शूटिंगच्या दिवसापर्यंत मी बिनधास्त होते. पण शॉट द्यायची वेळ आली तेव्हा मी नर्व्हस झाले. मी 18 वर्षांची होते आणि मला त्या नायकाबरोबर किसिंग सीन करायचा होता जो मला खूप आवडत असे आणि ज्याचे पोस्टर्स मी माझ्या रूममध्ये लावलेले होते. माझी अवस्था पाहून वडिलांनी मला एक असा सल्ला दिला जो आयुष्यभर माझ्या लक्षात राहिला. वडिलांनी सांगितले, ‘पूजा तू जर किसिंग सीन अश्लील समजशील तर तो अश्लीलच वाटेल. पण किसिंग सीन आणि लव्ह मेकिंग सीन हे वेगळे आहेत. किसिंग सीन खूपच ग्रेसफूल आणि अवखळपणाने दिला पाहिजे. तरुण मुलगी जेव्हा एखाद्याचा किस घेते तेव्हा तो अश्लील नसतो तर ती प्रेमाची निशाणी असते.’ त्यांचे हे वाक्य लक्षात ठेऊन मी किसिंग सीन केला होता असेही पूजाने सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला