दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरला मदत करण्याच्या प्रश्नाला सौरव गांगुलीने हे दिले उत्तर

Shreyas Iyer - Sourav Ganguly

सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) टीकाकारांनी मात्र असा आरोप केला आहे कि बीसीसीआयचे अध्यक्ष असताना ते एका फ्रँचायझीच्या कर्णधाराला मदत करत आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीवर DC चा कर्णधार श्रेयस अय्यरशी (Shreyas Iyer) बोलण्यावरून स्वारस्याच्या संघर्षाचा असल्याचा आरोप लावला त्यावर माजी कर्णधार म्हणाला की त्याने देशासाठी सुमारे ५०० सामने खेळले आहेत ज्यामुळे त्याला कोणत्याही खेळाडूशी बोलण्याचा आणि मार्गदर्शन करण्याचा अधिकार देतो मग तो श्रेयस अय्यर असो की विराट कोहली.

IPL च्या सध्याच्या हंगामात DC चा कर्णधार श्रेयस अय्यरने एका मुलाखतीत संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग आणि गांगुली (२०१९ मधील संघाचे मार्गदर्शक) यांच्या योगदानाबद्दल खुलासा केला होता ज्यामुळे त्याला यशस्वी खेळाडू आणि कर्णधार म्हणून वाढण्यास मदत झाली. गांगुलीच्या टीकाकारांचा आरोप आहे की बीसीसीआयचे अध्यक्ष असताना ते एका फ्रँचायझीच्या कर्णधाराला मदत करत आहेत.

गांगुलीने हे आरोप फेटाळून लावले आणि म्हणाले की, “मी गेल्या वर्षी त्याला (अय्यर) मदत केली होती. मी बोर्डाचे अध्यक्ष होऊ शकतो, परंतु हे विसरू नका की मी भारतासाठी सुमारे ५०० सामने (४२४ सामने) खेळले आहेत, म्हणून मी एका तरुण खेळाडूशी बोलू शकतो आणि त्याला मदत करू शकतो, मग ते श्रेयस अय्यर असो किंवा विराट कोहली. जर त्यांना मदत हवी असेल तर मी करू शकतो.”

अय्यरने नंतर ट्वीट करून म्हंटले की, “युवा कर्णधार म्हणून गेल्या हंगामात क्रिकेटपटू आणि कर्णधार म्हणून माझ्या प्रवासात भाग घेतल्याबद्दल मी रिकी आणि दादांचा आभारी आहो. एक कर्णधार म्हणून माझ्या वैयक्तिक प्रगतीत त्यांनी जी भूमिका बजावली त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER