हा व्हिडीओ परिस्थितीचे आव्हान पेलण्यास नक्कीच ऊर्जा देईल – आनंद महेंद्रा

Anand Mahindra

मुंबई : महेंद्र अँड महेंद्र उद्योग समूहाचे आनंद महेंद्रा  हे नेहमी जगण्याची उमेद जागवणारे किंवा बोध देणारे व्हिडीओ शेअर करत असतात.

सध्या कोरोनाच्या काळात मन उदास करणारे चित्र असताना आनंद महेंद्रा  यांनी शेअर केलेला व्हिडीओ शारीरिक न्यूनतेवर मात करून जीवन जगण्याचा संदेश देतो.

या व्हिडीओबाबत ते म्हणतात – या व्हिडीओचा कोरोनाशी काही संबंध नाही; पण कोरोनाच्या संकटकाळात परिस्थितीचे आव्हान पेलण्यास हा व्हिडीओ नक्कीच ऊर्जा देईल.

या व्हिडिओत दिसणाऱ्या मुलीला दोन्ही हात नाहीत. ती हातांची कामे – मोटारीचे दार उघडणे, गाडीची किल्ली लावणे, गाडी सुरू करणे आणि मोटार चालवणे हे सर्व पायांनी सहजतेने करते!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER