
मुंबई :- प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती आणि अनेक खेळाडू जखमी असताना भारतीय (India) संघाने ऑस्ट्रेलियात चमकदार कामगिरी केली. महत्त्वाचं म्हणजे ‘गाबा’ (Gabba) च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाची (Australia) विजयाची परंपरा मोडीत काढत भारताने मालिका २-१ ने जिंकली. यासाठी भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणालेत – ‘हा’ विजय कायम लक्षात राहील.
भारताने चौथ्या क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियावर मिळविलेल्या जोरदार विजयासह मालिका जिंकल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्णधार अजिंक्य रहाणे व टीमचे अभिनंदन केले आहे. “गाबाच्या मैदानावर अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात मिळालेला हा विजय सर्व भारतीयांच्या लक्षात राहील,” असे ठाकरे म्हणाले.
“पहिल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर देखील भारतीय संघाने दुर्दम्य आशावाद आणि जिद्दीच्या बळावर कसोटी मालिका जिंकली. धावांचा यशस्वी पाठलाग करताना भारतीय संघाने या मालिकेत नवीन विक्रम प्रस्थापित केला ही देशातील सर्व क्रिकेटवीरांसाठी अभिमानाची बाब आहे,” असे ते म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला