‘अबकी बार करोडो बेरोजगार, फक्त मोदी सरकार जबाबदार’; राहुल गांधींचा हल्लाबोल

PM Narendra Modi - Rahul Gandhi

नवी दिल्ली :- काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्रावर लक्ष्य केले आहे. कोरोना (Corona), जीएसटी (GST), लॉकडाउन (Lockdown) , सेंट्रल विस्टा प्रकल्प (Central Vista Redevelopment Project), अर्थव्यवस्था यासारख्या बऱ्याच गोष्टींवर त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आता बेरोजगारीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीमोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. केंद्राच्या ‘अब की बार मोदी सरकार’ या घोष वाक्याची त्यांनी खिल्ली उडवली.

मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. ‘अबकी बार करोडो बेरोजगार, कोण जबाबदार? फक्त आणि फक्त मोदी सरकार’ असे ट्विट त्यांनी केले आहे. याचबरोबर, ‘#अबकी बार करोडो बेरोजगार’ यासाठी हॅशटॅग वापरला. या ट्विटनंतर कमेंट्स बॉक्समध्ये काँग्रेस आणि भाजपा पक्षाचे कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button