
वरुण धवन (Varun Dhawan) आणि सारा अली खानचा (Sara Ali Khan) चित्रपट ‘कुली नंबर 1’ रिलीज झाला आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षांवर हा चित्रपट खरा उतरला नाही. यामुळे सोशल मीडियावर या गोष्टींची बरीच खिल्ली उडविली जात आहे. चित्रपटाचा एक देखावा सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेत आहे.
वास्तविक, चित्रपटात एक देखावा आहे ज्यामध्ये वरुण धवन ट्रॅकवर बसलेल्या मुलाला वाचवण्यासाठी धावत्या ट्रेनच्या पुलावरून उडी मारतो. तो ट्रॅकच्या वेगाने धावणाऱ्या ट्रेनच्या छतावर ट्रेनपेक्षा आणखी वेगाने पळायला लागतो. एका कोचवरून उडी घेऊन दुसर्या दुसऱ्या कोचवर पोहोचतो.
धावताना वरुण धवन ट्रेनच्या इंजिनवर पोहोचतो आणि मग तिथे गाडी येण्यापूर्वीच ट्रॅकवर उडी घेऊन मुलाला वाचवतो. वरुणवर चित्रीत झालेला हा देखावा आता प्रेक्षकांच्या घशात उतरत नाही आहे. लोक या देखाव्याची खिल्ली उडवत आहेत.
जब ट्रेन पर कूदा तो आगे की तरफ कैसे गुटाली मारी।
जब यह कूदा उस समय ट्रेन बच्चे से लगभग 2 मीटर दूर थी। तो लगभग 100 की स्पीड में 2 मीटर पार करने में 0.07 सेकंड
लगते हैं।
तो ये मादरणीय 0.07 सेकंड से कम समय में आगे कूदे वो भी बिना घिसटे और बच्चे को हटा दिया।RIP भौतिक विज्ञान 😭 pic.twitter.com/asoQMPq4gf
— रोहित.विश्नोई (@The_Kafir_boy) December 25, 2020
एका युझरने लिहिले आहे की, ‘जेव्हा ट्रेनवर उडी मारली तेव्हा समोर गुताली कशी मारली. जेव्हा याने उडी मारली तेव्हा ट्रेन मुलापासून सुमारे २ मीटर अंतरावर होती. तर सुमारे १०० च्या वेगाने २ मीटर ओलांडण्यास ०.०७ सेकंद लागतात. म्हणजे असं झाल की ०.०७ सेकंदांपेक्षा कमी वेळात पुढे उडी घेतली आणि न घासता मुलाला वाचवले.
दुसर्या युझरने लिहिले आहे की, ‘हे काहीही नाही. रजनीकांत तिथे असते तर त्यांनी रेल्वेचे ट्रॅक खेचले असते आणि तिथेच ट्रेन थांबवले असते. त्याच वेळी, दुसर्या युझरने लिहिले आहे, लॉजिक, फिजिक्स, कॉमनसेन्स आणि रोहित शेट्टीला सर्वांना मागे ठेवले.
Waah kya scene hai bhai @Varun_dvn 👌😭😭 pic.twitter.com/kEIFU7lpZE
— N (@NayabPokiri) December 24, 2020
विशेष म्हणजे हा चित्रपट गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या १९९५ साली रिलीज झालेल्या कुली नंबर 1 चा रिमेक आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले आहे. यात वरुण धवन आणि सारा अली खानशिवाय परेश रावल, राजपाल यादव, जावेद जाफरी, शिखा तलसानिया, साहिल वैद यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला