
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोडाने (Malaika Arora) प्रियकर अर्जुन कपूरसोबत नवीन वर्षाच्या निमित्ताने एक रोमँटिक फोटो शेअर केला होता, ज्यावर आता करीना कपूर खानची प्रतिक्रिया आली आहे. करीना कपूर खानने कमेंट करताना मलायका आणि अर्जुन यांना एक प्रश्न विचारला आहे.
करीना कपूर खानने यावर कमेंट करत प्रश्न केला की, “मेरे दो फेवरेट लोग, मेन्यू क्या है आज?” हा फोटो शेअर करताना मलायका अरोडाने कॅप्शनमध्ये लिहिले की ही नवीन दिवसाची सुरुवात आहे, नवीन पहाट, नवीन वर्ष २०२१ आहे, धन्यवाद. मलायकाच्या पोस्टवर कमेंटद्वारे चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली. मलायकानेही एक ग्रुप फोटो शेअर केला आहे ज्यात तिने बहिण अमृता अरोडा (Amruta Arora), अर्जुन आणि जवळच्या मित्रांसह पोज दिला आहे.
यापूर्वी मलायकाने गोवा वेकेशनच्या काही फोटो शेअर केले होते, त्यामध्ये ती अर्जुन कपूरसोबत दर्जेदार वेळ (Quality Time) घालवताना दिसली होती. एका फोटोमध्ये मलायका पूलमध्ये शिरताना दिसत होती, तर अर्जुन कपूर पूलमध्ये उभा होता आणि मलायकाच्या फोटोज क्लिक करत होता.
अर्जुनच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायच तर तो ‘भूत पोलिस’ चित्रपटात दिसणार आहे. कॉमेडी-थ्रिलर चित्रपटात सैफ अली खान आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा संपूर्ण स्टारकास्ट शूटिंगसाठी धर्मशाला येथे पोहोचला होता. याशिवाय पुढच्या चित्रपटात अर्जुन एकदा परिणीती चोप्राबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
View this post on Instagram
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला