या नवाबानं अभिनेत्रीचं मन जिंकण्यासाठी चार वर्ष वाट पाहिली!

Maharashtra Today

एखाद्याला त्याच्या प्रेयसीला इंप्रेस करायचं असेल तर कुणी फ्रिज गिफ्ट करेल का? एकायला विचीत्र वाटतं ना? पण भारतीय क्रिकेट टीमचे माजी कप्तान नवाब पटौदी खान(Nawab Pataudi Khan) यांनी असच काहीसं केलं होतं. बॉलीवूड आणि क्रिकेटचे संबंध अनेक दशकांपासून बहरत आलेले आहेत. अनेक क्रिकेटर्सचा जीव बॉलीवूड बालांवर आला. त्यापैकीच एक जोडी होती नवाब पटौदी आणि शर्मिला टागोर(Sharmila Tagore) यांची. अशा अनेक घटना घडल्या ज्या पाहून लोकांना वाटलं की या दोघांच नात टिकणार नाही; पण सर्वांवर मात करत त्यांनी नातं निभावलं.

पहिली भेट

६० ते ७० च्या दशकात एक अभिनेत्री बॉलीवूडमध्ये(Bollywood) तिच्या शैली आणि सौंदर्यामुळं धुमाकुळ घालत होती. त्याकाळात शर्मिला टागोर यांना भारतीय सिनेमात मोठा दर्जा होता. अनेकांच्या मनात शर्मिला टागोर यांच्याबद्दल प्रेम होतं. त्याच काळात भारतीय क्रिकेट संघाच्या कप्तानपदी सर्वात तरुण युवक होता. ज्यांच नावच त्यांची ओळख होती. नवाबी खानदानाशी संबंध असलेले ‘नवाब मंसुर अळी खान पटौदी.’ त्यांची शर्मिला यांच्याशी पहिली भेट झाली १९६५ला. भेटीचं रुपांतर मैत्रीत झालं. टीम इंडीयाचा आक्रमक फलंदाज मंसुर अली यांना बॉलीवूड सिनेमांमध्ये विशेष रस नव्हता. पंरतू शर्मिलांनी त्यांना बोल्ड केलं होतं. नवाब पटौदी खान पहिल्याच नजरेत शर्मिलाच्या प्रेमात पडले. नंतर भेटीची वारंवारता वाढली. नवाब पटोदी यांना शर्मिला यांच मन जिंकायचं होतं. परंतू ही गोष्ट वाटते तितकी सोप्पी नव्हती.

चार वर्षे लागली

पुढं शर्मिला यांना खुश करण्यासाठी प्रत्येक संभाव्य प्रयत्न त्यांनी केला. जेव्हा त्यांना रहावलं नाही तेव्हा त्यांनी शर्मिला यांना प्रपोज केलं. शर्मिला यांनी त्यांचा प्रस्ताव स्वीकारला नाही. यानंतरही त्यांच मैत्रीचं नात होतं. हळू हळू नवाबांचा अंदाज शर्मिला यांना आवडायला लागला. दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवणं आवडू लागलं. विशेष म्हणजे शर्मिलांच मन जिंकण्यासाठी नवाबांनी शर्मिलांच्या घरी फ्रिज पाठवला. त्यावेळी फ्रीज ही वस्तू खानदानी लोकांची निशाणी होती. भारतीय टीमचा कॅटन नेट प्रॅक्टीस कमी आणि शर्मिलांच मन जिंकण्यासाठी प्रयत्न जास्ती करु लागला. पटोदी यांनी शर्मिला टागोरांना सलग चार वर्ष फुलांचे गुलदस्ते आणि प्रेमपत्रं पाठवली. तेव्हा कुठं शर्मिला टागोर यांनी स्वीकार दर्शवला.

प्रेमाला लग्नात बदलणं नव्हतं सोप्प

जेव्हा दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा त्यांच्या समोर नवी अडचण निर्माण झाली. लग्नाची, असं म्हणतात की शर्मिला जेव्हा क्रिकेटचे सामने बघायला स्टेडीअममध्ये जायच्या तेव्हा नवाब पटोदी छक्का मारुन त्यांचं स्वागत करत. बॉलीवूडच्या या अभिनेत्रीनं भारतीय क्रिकेटच्या सर्वात आक्रमक फलंदाजाला मोहिनी घातली होती. दोघांना लग्न करायंच होतं परंतू ती इतकी सोप्पी गोष्ट नव्हती. नवाबांच्या घरात या नात्याला मंजूरी नव्हती. त्यांची सुन सिनेमात काम करणारी अभिनेत्री नसावी अशी त्यांची इच्छा होती तर आपल्या मुलगीनं मुस्लीम घरात सुन म्हणून जावं हे शर्मिला यांच्या घरच्यांना मंजूर नव्हतं. त्यांनी सर्वात पहिला बिकनी शुट दिला होता. शर्मिलांच्या या कृतीमुळं पटौदी आणि त्यांच लग्न होईल ही शक्यता धुळीस मिळाली होती.सगळ्याच अडीअडचणींवर मात करत त्यांनी दोघांच्या घरच्यांची समुजत काढली. २७ डिसेंबर १९६९ ला दोघांनी धुमधाममध्ये लग्न लग्न केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button