कॅन्सरसह अनेक आजारांवर गुणकारी आहे हा मशरूम; किंमत मात्र …

दिल्ली :- चीन आणि तिबेटमध्ये पिकणारा ‘कॉर्डिसेप्स मिलिटारिस’ (Cordyceps Militaris) जातीचा मशरूम कँसरसह मलेरिया, थकवा कमी करणे आणि HIV वर गुणकारी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या मशरूमला १.५० लाख रुपये दर मिळतो! याला हिमालयातील सोन म्हणतात.

गुजरात इंस्टीट्यूट ऑफ डेजर्ट इकोलॉजी (GUIDE) च्या वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेच्या नियंत्रित वातावरणात या मशरूमचे ९० दिवसात उत्पादन घेतले आहे. या मशरूममध्ये, चीन आणि तिबेटमध्ये उत्पादित होणाऱ्या मशरूमसारखे एँटीऑक्सिडेंट आणि ऍन्टीव्हायरल तत्व आहेत की, नाही याची चाचणी सुरू आहे.

प्रशिक्षण

या मशरूमच्या उत्पादनासाठी गुजरात इंस्टीट्यूट ऑफ डेजर्ट इकोलॉजी सवलतीच्या दरात युवकांना प्रशिक्षण देणार आहे. अन्यत्र प्रयोगशाळा या १ आठवड्याचा प्रशिक्षणासाठी १ लाख रुपये शुल्क घेतात.

कॅन्सरबाबत होणार संशोधन

यात सापडणाऱ्या औषधी गुणांचा कॅन्सर सारख्या आजारात किती उपयोग होतो. यावर संशोधन करण्यात येणार आहे. यातील ऍन्टीट्यूमर प्रॉपर्टीजचा अभ्यास केला जाणार आहे. कॅन्सर सारख्या आजारात ट्युमर कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो का ? याची चाचणी करण्यात येईल. कॅन्सरवर मशरुमचा अर्क परिणामकारक आहे, असा वैज्ञानिकांचा दावा आहे. प्रोटेस्ट कॅन्सर पेशींवर होणाऱ्या परिणामावरही अभ्यास सुरू आहे. मात्र, अद्याप माणसांवर याची टेस्ट होणे बाकी आहे.

ही बातमी पण वाचा : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ग्रीन टी ठरु शकते सुपर ड्रींक!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button