हा खासदार म्हणतो, स्मारकाऐवजी बाळासाहेबांच्या नावाने ४०० कोटींची रुग्णालये उभारा

imtiaz jaleel - Uddhav Thackeray

दिल्ली : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मारकासाठी मंजूर झालेले ४०० कोटीये रुग्णालये उभारण्यासाठी वापरा आणि त्या रुग्णालयाना बाळासाहेबांचे नाव द्या, अशी सूचना एआयएमआयएम (AIMIM) चे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी महाविकास आघाडी सरकारला केली आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. या घोषणेनंतर इम्तियाज जलील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला सध्या स्मारकांची नव्हे, तर रुग्णालयांची आवश्यकता असल्याचे म्हणत ही सूचना केली आहे.

इम्तियाज जलील यांनी ट्विट केले – “बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ४०० कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा प्रत्येकी १०० कोटी खर्चून राज्यात ४ मोठी रुग्णालये त्यांच्या नावाने सुरू करता येतील या रुग्णालयांना बाळासाहेबांचे नाव दिले तरी आमची काही हरकत नाही. जनतेला सध्या स्मारकांची नव्हे, तर रुग्णालयांची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER