विजयाचा ‘हा’ क्षण भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक, शरद पवार यांनी दिल्या शुभेच्छा

Sharad Pawar - Team India

गाबा (Gabba) येथे मंगळवारी(19 डिसेंबर) भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघात चौथा कसोटी पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाला 328 धावांचे लक्ष्य दिले होते. भारतीय संघाने या आव्हानाचा पाठलाग करताना 96.6 षटकांत 7 गडी गमावून 329 धावा काढत पूर्ण केले. त्यामुळे भारतीय संघाने चार सामन्याची बॉर्डर गावसकर मालिका 2-1 या फरकाने जिंकली. त्यामुळे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) सोशल मीडियावरून भारतीय संघाचे कौतुक केले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्यांची बॉर्डर गावसकर मालिका पार पडली. या मालिकेतील गाबा येथील सामना जिंकत भारतीय संघाने मालिका आपल्या नावावर केली. त्याचबरोबर भारतीय संघाने गाबा येथे तब्बल 32 वर्षानी पहिला विजय नोंदवला. त्यामुळे भारतीय संघासाठी हा विजय दोन कारणांनी ऐतिहासिक ठरला. एक म्हणजे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात दुसर्‍यांदा मालिका जिंकली. दुसरे 32 वर्षानंतर गाबाच्या मैदानावर एखाद्या संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवण्यात यश मिळाले. त्यामुळे भारतीय संघावर या ऐतिहासिक विजयानंतर माजी आयसीसी अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय संघाला शुभेच्या दिल्या आहेत.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ट्विट करतांना लिहले की, “ऑस्ट्रेलिया संघावर मिळवलेल्या विजयासाठी भारतीय संघाचे अभिनंदन. भारतीय क्रिकेटसाठी आजचा विजय निश्चितचं ऐतिहासिक आहे. ब्रिस्बेनमध्ये 32 वर्षांनी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर गाबा येथे विजय मिळवला. वेल डन.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER