पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे हा क्षण सत्यात उतरला आहे – योगी आदित्यनाथ

PM Narendra Modi - CM Yogi Adityanath

अयोध्या : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राम मंदिर(Ram Mandir) भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(PM Narendra Modi) हस्ते पार पडला . या क्षणामागे ५०० वर्षांचा संघर्ष, साधना आहे. भारताची लोकतांत्रिक मूल्ये, कायदेशीर प्रक्रिया, संविधानाची संमती या सगळ्या प्रक्रियेतून जात आज हा दिवस दिसतो आहे. या क्षणाची वाट पाहात अनेक पिढ्या गेल्या. अनेक महापुरुषांनी बलिदान दिलं. आपल्या डोळ्यांसमोर राम मंदिर उभं राहावं अशी अनेकांची इच्छा होती. नरेंद्र मोदींनी कायदेशीर तसेच शांततेच्या मार्गाने समस्येचे निराकरण कसे केले जाते हे दाखवून दिले आहे. नरेंद्र मोदींमुळे हा क्षण सत्यात उतरला आहे- असे वक्तव्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(CM Yogi Adityanath) यांनी केले.

१३५ कोटी भारतवासीयांसाठी आणि जगातील अनेक हिंदूंच्या भावनांना पूर्ण करणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान आहेत, असेही योगी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER